Posts

शेवगाव नगर जिल्ह्यातील शेवटचे गाव. बीड, औरंगाबाद, नगर जिल्ह्याच्या शिवावरचे गाव. म्हणजे खरे ते शिवगाव. पुढे अपभ्रंशाने शेवगाव झाले. साधारणतः वीस बावीस हजार लोकवस्तीचे शेवगाव माझ्या सासुरवाडीचे गाव. २००४ ला मी या गावचा जावई झालो आणि गावाशी माझा प्रेमाचे संबंध जोडले गेले. आता सासुरवाडी म्हणजे जाणे येणे आलेच. मला पाच तासांचा प्रवास करून येथे पोहचावे मागते. यासाठी कमीत कमी दोन दिवसांचा दौरा निश्चित करावा लागतो.  आमच्या सौ.ला जसे तिच्या आई-वडिल, भाऊ-भावजयी मंडळींना भेटण्याच्या ओढ असते तसे मलाही माझ्या इको-मॅनेजमेंट गुरूंना भेटण्याची ओढ असते. हो येथेच आहे माझे आर्थिक व्यवस्थापक. ते अचानक भेटले त्यांनी निस्वार्थी, निशुल्क व्यवस्थापन दिले अगदी सहज बोलता-बोलता... ही गोष्ट आहे२००४ ची. माझे नुकतेच लग्न झालेले होते. जवळची बचत लग्नात खर्च झालेली होती. व्यवसाय अस्थिर परिस्थितीत होता. नवीन लग्न झालेले असल्यामुळे देव दर्शने, थंड हवेचे ठिकाणे वैगरेत आणखी पैसे खर्च झाले.  व्यवसाय पहिलाच अस्थिर त्यात पुन्हा अनु-उपस्थीती. मी आर्थिक अडचणीत येवू लागलो. छोट्या गरजाही पुर्ण होत नव्हत्या. कर्ज झाले, हात उसने झ
  पुल रावसाहेब आणि मी. बरेच दिवसांपासून सौ च चालू होतं आपण एकदा बेळगावला आत्याकडे जाऊ या. हो नक्कीच. कुठल्याही गोष्टीला लगेच हो म्हणणे माझ्या स्वभावात नाही. पण बेळगावला जायचं. रावसाहेबांच्या गावाला जायचं. बालपणी मामाच्या गावाला जायचा जो आनंद होत असे त्याची पुनः अनुभूती होत होती. तरीही उगीच तुझा हट्ट आहे म्हणून जातोय असं हिला दाखवत होतो. डिसेंबर 2018 ला प्रवास ठरला. ठरल्याप्रमाणे आम्ही बेळगावच्या प्रवासाला निघालो. भलामोठा प्रवासकरून रेल्वे बेळगावच्या फलाटावर पोहचली तेव्हा सायंकाळचे 5 वाजले होते. नेहमीप्रमाणे आपली मेकउपची पर्स घेऊन ही सरळ चालू लागली आणि मीही नेहमीच्या सवयीप्रमाणे दोन्ही खांद्याला दोन मोठया पिशव्या अडकवून हातांमध्ये ब्यागा उचलून गर्दीत वाट शोधत होतो. ही आपली निहात्ती असल्याने गर्दीतून सहज मार्ग काढून डब्याच्या बाहेर पोहचली. मला मात्र चार फूट रुंद व्यासात चालायचे होते. थांबा हो. हे सामान बाजूला करा. का एवढं बोजा घेवून लोकं प्रवास करता देव जाणे. असे लोकांचे टोमणे मूकपणे ऐकावे लागत होते. मलाही कळत नव्हते चार दिवसाच्या मुक्कामाला हिला हिच्या सर्व साड्या, ड्रेस, बांगड्या, तीन